🛑 ऐतिहासिक चित्रपट मुलांनी एकत्र बसून अनुभवला
🛑 कणकवली :
चौथीच्या ' शिवछत्रपती ' या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली आहे. त्यातील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव शिडवणे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे सिनेमागृहात जाऊन घेतला.
" पावनखिंड " हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असला तरी त्यात शिवाजी महाराज , शंभूराजे , बहिर्जी नाईक , जिजाऊ , हरप्या , कोयाजी , रायाजी बांदल , दिपाई , अगिन्या , शिवा काशिद , पंत , किल्लेदार आणि अशा अनेक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावेळी घडलेले प्रसंग जसेच्या तसे मुलांच्या लक्षात राहण्याइतके दाखवले गेले आहेत.
त्यावेळी शाळेतील बत्तीस मुले , शिक्षक प्रवीण कुबल , सुजाता कुडतरकर , सीमा वरूणकर , मुख्याध्यापक सुनिल तांबे आणि शिक्षणप्रेमी सुनिल शेट्ये , पालक सचिन टक्के आदी उपस्थित होते. माफक दरात चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चित्रमंदिर व्यवस्थापनाचे व शिक्षण विभागाचे सर्व पालक , शिक्षक यांनी आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment