Monday, March 28, 2022

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

          मला शेर्पे केंद्रात आता तीन वर्षे होतील. मी हजर झालो , तेव्हा शेर्पे केंद्रशाळेचा मुख्याध्यापक चार्ज अमोल भंडारी यांच्याकडे होता. त्यावेळी पाठयपुस्तके आणण्यासाठी मी केंद्रशाळेत गेलो होतो. अमोल भंडारी हे एक आमच्यापेक्षा वयाने लहान असलेले उपशिक्षक तिथे मार्गदर्शन करताना दिसले. तेव्हाच त्यांचा माझ्यावर पहिला वहिला प्रभाव पडला होता. मुद्देसूद मार्गदर्शन करत केंद्रमुख्याध्यापकांची जबाबदारी ते पेलताना दिसत होते. 

          त्यानंतर तीन वर्षात त्यांच्यासोबत विविध उपक्रमांच्या निमित्ताने पुनः पुन्हा भेट झाली. प्रत्येकवेळी त्यांच्यातील धडपड करणारा शिक्षक मला खुणावत होता. मी त्यांच्या वयाचा असताना अगदी असाच होतो याची जाणीव होऊन मला त्यांच्याविषयी असलेला आदर वाढत जाताना दिसत होता. शिक्षकाने नेहमी असेच असावे , नेहमी कार्यरत. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे ,  सरळ आहे. त्यांना स्वतःची ओळख करुन देण्याची गरज पडत नाही , त्यांचे शैक्षणिक कार्यच त्यांची ओळख बनली आहे. शेर्पेसारख्या दुर्गम भागात अमोल भंडारींसारखे शिक्षक कार्यरत असतील तर ते तिथल्या विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणायला हवे. 

          आपल्या शैक्षणिक कार्याने मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे माझ्यासारखा शिक्षक नक्कीच सांगू शकतो. यश मिळवण्यासाठी जी जिद्द लागते , ती त्यांच्याकडे आहे. त्यांनी मुलांना यश मिळावे म्हणून आपला वैयक्तिक वेळही मुलांसाठी दिलेला असेल. कारण काही काळ त्यांनी आपले व्हॉटस ऍप , फेसबुक बंद ठेवले होते हे मला माहिती आहे. आता आपल्याला या तंत्रांची इतकी सवय झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणे ही अशक्यच गोष्ट आहे. तरीही अमोल भंडारी यांनी त्यावर कमालीचा संयम बाळगला होता. 

          नेट सेटची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एक हुशार प्राथमिक शिक्षक आहेत. ते आपली फुशारखी मारताना मला कधी दिसलेले नाहीत. ते म्हणूनच मला जास्त आदर्श वाटतात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु शकणाऱ्या मार्गदर्शकांमध्ये त्यांचा वरचा नंबर लागेल. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन यु ट्युबच्या माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे. अशा तरुण व उमेदीने शिकवणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांनी गावोगावी शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उद्युत करायला हवे. त्यासाठी अमोल भंडारी सरांचे अनमोल मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर असते. तिच्यात खंड पडला की विद्यार्थ्यांना भविष्यात त्याची किंमत मोजावी लागते. अखंडपणे सलग अव्याहतपणे काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांकडून म्हणूनच भव्य दिव्य असे शैक्षणिक कार्य घडते आणि आम्हां शिक्षकांची मान अभिमानाने अधिकाधिक उंचावत राहते. 

          अमोल भंडारी हे शिक्षण क्षेत्राला लाभलेले एक अनमोल रत्नच आहेत. त्यांचे आडनांव भंडारी आहे आणि ते स्वतः ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांच्या मनात कायमच मुलांच्या स्पर्धाविषयक विविध प्रश्नांची चक्रे फिरत असतील. कधी एकदा शाळेत जातो आणि मुलांना सांगून टाकतो असे त्यांचे नेहमीच होत असेल. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असतीलही , त्यांना त्या पुरस्काराने अधिक प्रोत्साहन मिळत राहते. खेड्यापाड्यात काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांचा म्हणूनच सन्मान होत राहिला पाहिजे. अशा अमोलांना पुरस्कारापेक्षा शाबासकीची थाप महत्त्वाची असते. पदाधिकारी , अधिकारी , पालक यांनी दिलेली अशी जिव्हाळापूर्ण थाप अमोलांना अनमोल बनवते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



5 comments:

  1. अगदी योग्य लिहिले आहे कुबल सर।अमोल हा शिक्षण विभागातील हिरा आहे।त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।भविष्यात तो एक उच्च पदावर विराजमान असेल।
    आपल्या लेखणीने योग्य दखल घेतली ।धन्यवाद
    अभिनंदन

    ReplyDelete
  2. गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः🙏🙏

    ReplyDelete
  3. धन्यवाद मित्रांनो

    ReplyDelete
  4. छान लेख. नेट सेटची परीक्षा पास
    झालेले शिक्षक इथे आहेत खरोखरच अभिमानास्पद!

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...