आपल्या मुलांमधील सुप्तगुण जोपासणे हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे. मुलं म्हणजे चैतन्याचा झरा असतात. तो सतत पाझरत ठेवणं हेही पालकांचंच काम. मुलगी म्हणजे बापासाठी धनाची पेटीच असते असे म्हटले जाते. हे स्त्री धन जपायला हवं. त्यांच्या सुप्तगुणांना वाव देत राहायला हवा.
भिरवंडे गावातील एक मुलगी कॅरम खेळाने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊ शकते ही मुलीची ताकद तिच्या पालकांना म्हणूनच अभिमानास्पद ठरु शकते. तिचे नाव दिक्षा असे आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी विभागाचे नाभिक अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांच्या मोठ्या मुलीने आपले आणि आपल्या नाभिक समाजाचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. ती आम्हां नाभिकांसाठीची अस्मिता आहे. " मूर्ती छोटी , पण किर्ती मोठी " असे तिचे भव्य दिव्य कार्य बघितले की आमचा प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन येतो. तिच्या माता पित्यांची साथ तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती स्वतः दहावीच्या वर्गात शिकत असतानाही कॅरम खेळ खेळते आहे. हल्लीच तिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही आमच्या मानाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवण्यासारखी गोष्ट आहे.
दिक्षा ही मुलगी अभ्यासातही हुशार आहे. तिने आपल्या खेळातील कौशल्य अधिकाधिक वाढवावे. खेळाबरोबर अभ्यासातही लौकिक मिळवावा. तिच्या प्रत्येक स्ट्राईकला पॉकेटमध्ये जाणारी सोंगटी पाहिली की थक्क व्हायला होते. तिच्या हातात स्ट्रायकर आला की तो तिचा गुलामच बनतो. तिच्या मनात येईल तसा तिचा स्ट्रायकर चालतो. खूप कमी वेळात ती खेळ पूर्ण करते. तिचे हे यश असेच वृद्धिंगत होत राहावे अशी शुभेच्छा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
अभिनंदन 💐🏆
ReplyDelete👍🥰👌
ReplyDeleteCongratulations Diksha
ReplyDeleteCongratulations 👏👏👏👏👏👏👍
ReplyDelete