शिडवणे नं. १ शाळेत ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ उपक्रम संपन्न
शिडवणे : गेली काही वर्षांपासून शासनाने ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ हा उपक्रम शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी शिडवणे नं. १ शाळेने टक्केवाडी येथील शेतात जाऊन ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ हा उपक्रम संपन्न केला.
त्यावेळी शिडवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल पांचाळ म्हणाले , “ शाळेतील मुले स्वतः श्रमप्रतिष्ठा जोपासत आहेत. त्यांनी तरवा काढला , लावणी केली. गावातील टक्केवाडीमध्ये येऊन शेतीकामाचे धडे घेतले. शाळेचा हा उपक्रम मुलांना शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण करणारा आहे.”
इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व मुलांनी शेतीकामामध्ये सहभाग घेतला. एक काडी पद्धतीने लावणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तरवा काढण्याचे प्रशिक्षण घेतले. पॉवर टिलरची माहिती घेतली.
शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी उपस्थित शेतकरी निलेश टक्के , सचिन टक्के आणि उपसरपंच अनिल पांचाळ यांची मुलाखत घेत मुलांना अधिक माहिती दिली. मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी पॉवर टिलर चालवून प्रात्यक्षिक करुन घेतले. ‘ एक दिवस बळीराजासाठी ’ उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रवीण कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.


























No comments:
Post a Comment