🔴 फोन संध्या
सध्या फोनवरुन ओळखी होण्याचे दिवस आले आहेत. पूर्वी आपले पत्रमित्र असत. आता फोन मित्रांची ( किंवा मैत्रिणींची ) संख्या वाढली आहे. पत्रमित्र इतिहासजमा झाले आहेत. माझे अनेक फोन मित्र आहेत. ज्यांची कधीतरी पुसटशी भेट झाली असेल, त्यांच्याशीही आपली फोन मैत्री होऊन जाते. काहीवेळा ही फोन मैत्री करण्यासंदर्भात खूपच काळजी घ्यावी लागण्याचेही दिवस आले आहेत.
फेक कॉल येतात तेव्हा बेजार व्हायला होते. त्रास देण्यासाठी अनोळखी फोन येतात , तेव्हा ते समजून कट करणं जास्त सावधगिरीचं असतं. एकूणच काय तर फोन करणं , फोन येणं , फोन घेणं , फोनवर जास्तवेळ बोलत राहणं , फोनवर मित संभाषण करणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं.
माझे तसे अनेक मित्र आहेत. मैत्रिणी असल्या तरी त्यांचे कामाशिवाय कधीच फोन येत नाहीत. मित्र सुद्धा उगीच फोन करुन त्रास देणारे अजिबात नाहीत. मीही तसा कोणाला फोन करुन तासनतास बोलत राहणं टाळतो. प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा असतो. मी शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्याने पालकांचे फोन येतात. ते महत्त्वाचे असतात , ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. फोन करणारे नातेवाईक क्वचित असतात. त्यात वर वधु यांच्या माहितीसाठीचे फोन जास्तीचे असतात. आपल्याला आता कोणतेही फोन नको असले तर फोन स्विच ऑफ ठेवणं अधिक चांगलं असतं. तरीही आपला महत्त्वाचा फोन येण्याची शक्यता असली तर फोन चालू ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. संध्याकाळी कामावरुन आल्यावर अनेकजण निवांतपणे फोनवर बोलताना मी अनेकदा पाहिले आहे .
काही युवक युवती तर सतत कानाला ब्लुटुथ डिव्हाईस लावूनच असतात. त्यांचे खूप महत्त्वाचे फोन सतत चालू असतात. समोरुन कुणीतरी बोलत असतो / असते , इकडून कधीतरी रिप्लाय दिले जात असतात. त्यांची कोड लँग्वेज आमच्या जुन्या पिढीला खूप कमी समजते. त्यासाठी एखादी पीएचडी करावी लागेल. ही मंडळी नुसती फोनला कायमची चिकटूनच असतात. रेंज गेली कि यांचा प्रॉब्लेम होतो खरा. प्रवासात तर यांच्या फोनचा पुरेपूर वापर होत असतो . मोबाईल अजिबातच बाजूला ठेवण्याचे नाव घेत नाहीत ही मंडळी. बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत ' लगे रहो ' हे ब्रीदवाक्य इमानदारीने पाळणे यांचा चांगले जमते.
त्यादिवशी मी सावंतवाडीवरुन कणकवलीपर्यंत एसटीने प्रवास करत होतो .
No comments:
Post a Comment