माझी आई म्हणजे एक सुंदर स्वप्न .....आज २ जुलै २०१९ ...१० वर्षांपूर्वी आज माझी आई मला सोडून देवाघरी गेली. तिची आठवण येते आणि खूप उणीव भासते. आम्ही ५ भावंडे ...ताई, आका, मी बाळू , न्हानू आणि पपी ....सर्वजण आज अगदी मजेत आणि तिच्या छत्रछायेखाली सुखासमाधानात आयुष्य उपभोगताना ती सर्वत्र असायला हवी होती. ती खूप सहनशील होती. आम्ही लहान असताना आम्हाला ती कधी मनाला लागेल असे बोलली नाही. तिचा सहवास आम्हाला नेहमीच हवाहवासा वाटणारा.... कधी तिच्या कुशीत जायला मिळते यासाठी आम्हा भावंडांमध्ये चढाओढ लागत असे. ती बिचारी सर्वांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करताना नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवत असे. तिने आपले दुःख कधीच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आपले दुःख आपल्याकडेच ठेवून नेहमी आनंदात जगण्याचा अनमोल मंत्र आईने आम्हा सर्व भावंडांना दिला.
दिसायला अगदी साधी...पण खूप प्रेमळ स्वभावाची आमची आई सर्वांशी खूप कमी बोलत असे. खूप चर्चा करत वेळ घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. ती नेहमी आपल्या कामात दंग असे. जगाशी प्रेमाने वागावे असे तिनेच आम्हाला शिकवले. ती न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जात असे. अजूनही आठवण येते आणि सर्रकन अंगावर काटा उभा राहतो. आता ती असती तर तिला किती आनंद झाला असता. नातवंडांबरोबर गमतीजमती करता आल्या असत्या. दररोज झोपताना तिची नामजप केल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. तिला आठवत झोपी जावे...जगातील सर्व समस्या आपोआप कमी होऊन शांत झोप लागते असा माझा नेहमीच अनुभव आहे.
कामात माझी आई पटाईत होती. जेवण बनवणे, उसळ, चपाती, भाकरी, पुरणपोळ्या , टोमॅटोची आमटी ( आम्ही पूर्वी सार म्हणत असू ) , फोडणीचा भात , पिठी, वडे सागोती, भजी असे पदार्थ बनवून ती आम्हाला जेवू घाली. जे घरात असे त्यात ती माऊली आम्हाला कधीच कमी पडू देत नसे. पण आम्हाला जेवायची घाई झालेली असे, ती बनवत असतानाच आम्ही दोघे भाऊ त्यावर फडशा पडत असू. ती शांतपणे त्यात आनंद मानायची. कारण कधी आम्ही एवढे जेवत असू कि आम्ही तिच्या वाटणीचे जेवणही फस्त करीत असू. मग ती म्हणे कि ' तुम्ही जेवलास कि माझा पॉट भरला '. आता आमच्याकडे भरपूर अन्न आहे, खायला खूप आहे, पण पूर्वीची मजा येत नाही. आई नसल्यामुळे तिची उणीव जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती भरून काढू शकत नाही हे सत्य आहे.

No comments:
Post a Comment